• Dinbandhu Gramin Vikas Sanstha, Deori, Maharashtra
  • 7218942626
  • dgvsdeori@gmail.com
Dinbandhu Gramin Vikas Sanstha Deori Gondia Drug Distribution Camp

“दमा” या आजारावर मोफत औषध वितरण शिबीर संपन्न

Event Details:

Organizer:

आयोजनाचा उद्देश: -

  • गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील माँ धुकेश्वरी मंदिर सभागृहात सुवर्णप्राशन फाऊंडेशन आणि दिनबंधु ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून मोफत आयुर्वेदिक औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
  • या शिबिरामध्ये दमा, जुनाट सर्दी, अस्थमा यांसारख्या आजारांवर आयुर्वेदिक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले.
  • या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यातील जवळपास ४४५ रुग्णांनी सहभाग घेतला.
  • आयुर्वेदाचार्य सुनील समरीत यांनी रुग्णांची तपासणी करून ३२७ रुग्णांना दमा औषधांचे वितरण केले.
  • औषध वितरणाचे कार्य माँ धुकेश्वरी मंदिर समितीचे अध्यक्ष मा.ॲड. प्रशांत संगीडवार, सचिव सुशीलजी शेंद्रे, सुवर्णप्राशन फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष मा. आयुर्वेदाचार्य सुनील समरीत, बिरसा ब्रिगेडचे संघटक मा. चेतनदादा उईके, दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मा. कुलदीप लांजेवार, जि.प. कर्मचारी पतसंस्थेचे संचालक मा. विनोद चौधरी, सुवर्णप्राशन फाउंडेशनचे विश्वस्त मा. शरद समरीत यांच्या हस्ते करण्यात आले.
  • दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे शिबीर आयोजित करण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.
  • शिबिराच्या आयोजनासाठी सुवर्णप्राशन फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. हितेश्वरी समरीत, दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव सौ. कल्याणी लांजेवार, नागेश कसोंदी, गोपाल चनाप यांनी सहकार्य केले.
Dinbandhu Gramin Vikas Sanstha Deori Gondia Drug Distribution Camp
Dinbandhu Gramin Vikas Sanstha Deori Gondia Drug Distribution Camp
Dinbandhu Gramin Vikas Sanstha Deori Gondia Drug Distribution Camp