• Dinbandhu Gramin Vikas Sanstha, Deori, Maharashtra
  • 7218942626
  • dgvsdeori@gmail.com

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिकन्यायदिन रक्तदान शिबीर यशवंत अधिकारी सत्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 2026

Event Details:

Organizer:

आयोजनाचा उद्देश: -

आज (दिनांक २६ जून २०२६) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनबंधु ग्रामीण विकास संस्था, देवरी अंतर्गत संचालित दिनबंधु अभ्यासिका येथे/यशवंत अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम तसेच भव्य रक्तदान शिबिर मा.श्री.गंगाधरजी परशुरामकर (सरपंच, ग्राम पंचायत खोडशिवनी तथा संचालक, जिल्ह्य मध्यवर्ती बँक गोंदिया ),यांच्या अध्यक्षतेखाली तर उद्धघाटक म्हणून मा. श्री.जनार्दन हेगडकर (ठाणेदार, पोलीस स्टेशन चिचगड,तालुका -देवरी ) तर मा.श्री.संतोष गुट्टे (पोलीस उपनिरीक्षक, AOP मगरडोह, तालुका – देवरी ),मा.श्री.विलास शिंदे (तालुका प्रतिनिधी – दैनिक लोकमत ),मा.श्री.एलीयाज कुरेशी(अध्यक्ष – हेल्पिंग ग्रुप देवरी ),संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. कुलदिप लांजेवार या मान्यवरांच्या उपस्थिती मद्ये आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून प्रशासनात स्थान मिळवलेल्या यशवंत अधिकारी मा.श्री.संतोष गुट्टे,जिल्हा पोलीस दलात देत असलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल मा.श्री.जनार्दन हेगडकर या अधिकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाचा गौरव करताना उपस्थित विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणेचे जिवंत उदाहरण ठरले.त्यानंतर आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात मान्यवर अधिकारी व मार्गदर्शकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी, अभ्यासाचे योग्य नियोजन, सातत्य, आत्मविश्वास आणि यशाचा प्रभावी मंत्र विद्यार्थ्यांना दिला. यशस्वी अधिकाऱ्यांनी स्वतःचे अनुभव सांगत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले आणि ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा दिली.


याच दिवशी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात अभ्यासिकेतील विद्यार्थी, युवक-युवती तसेच देवरी नगरातील अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश कृतीतून साकार झाला.
यशाचा सन्मान, ज्ञानाचे मार्गदर्शन आणि समाजसेवेचा संस्कार अशा त्रिवेणी संगमाने आजचा दिवस संस्मरणीय ठरला.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, यशवंत अधिकारी, मार्गदर्शक, रक्तदाते, अभ्यासक, स्वयंसेवक आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने मनस्वी धन्यवाद.🙏