देवरी – गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक देवरी येथील आफताब मंगल कार्यालयात सुवर्णप्राशन फाऊंडेशन,दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमा चे औचित्य साधून दमा,जुनाट सर्दी,अस्थमा, एलर्जी अश्या प्रकारची आजार बरे होण्यासाठी मोफत आयुर्वेदिक औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.गत ४ वर्षांपासून या शिबिराचे आयोजन केले जात असून ,या शिबिराला विदर्भातील विविध जिल्ह्याततील रुग्णांचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळत असून गोंदिया,भंडारा,गडचिरोली, नागपूर,चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातील जवळपास ५५७ रुग्ण सहभागी झाले असून,आयुर्वेदाचार्य सुनील समरीत यांच्याकडून त्यांची चिकित्सा करून ४९७ रुग्णांना दमा या आजाराच्या औषधी चे मोफत वितरण कृषी उत्पन्न बाजार समिती देवरी चे संचालक यादोराव पंचमवार यांच्या अध्यक्षतेखाली तर जि.प. सदस्या सौ. उषाताई शहारे, डॉ. गुरुदेव कापगते, डॉ. अमित येडे,डॉ. सुजाता ताराम,ब्लॉसम पब्लिक स्कुल चे मुख्याध्यापक डॉ. सुजित टेटे,पंचायत समीती चे ग्राम विस्तार अधिकारी झामरे,सुवर्णप्राशन फाउंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष आयुर्वेदाचार्य सुनील समरीत,दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मा.कुलदिप लांजेवार,सुवर्णप्राशन चे विश्वस्त डॉ. रुपेश परशुरामकर,यांच्या हस्ते वितरण करण्यात आले असून शरद पौर्णिमा आणि दमा या आजाराचा निकटचा संबंध असल्याने आणि दिवसेंदिवस हे आजाराची लागण वाढत असल्याने दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा च्या दिनी हे शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.विशेष म्हणजे गत ४ वर्षांपासून आयोजित या शिबिरामद्ये सातत्याने ही औषध सेवन करण्यासाठी सहभागी झालेले रुग्ण यावर्षी सुद्धा सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनील समरीत, संचालन विलास शिंदे तर आभार कुलदिप लांजेवार यांनी मानले.शिबिराच्या आयोजनासाठी दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे विश्वस्त दिपक लांजेवार,मित्र परिवाराचे संदीप महोबिया, युगेश बिसेन, किशोर येनप्रेडीवार,शुभम वाडीभस्मे ,योगेश साखरे,दिवाकर शेंद्रे,भुवनेश निर्वाण,सोमाजी आस्वले तन्मय रहीले, अंकुश गुप्ता,कुलदिप बघेले यांच्यासह दोन्ही सामाजिक संस्थेच्या विश्वस्त आणि स्वयंसेवकांनी यांनी सहकार्य केले
Subscribe to our newsletter to get our daily latest news and updates
PROJECTS COMPLETED
RAISE TILL TO DATE
HAPPY CUSTOMERS